शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही..."; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:44 IST

संसदेतल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

DK Shivakumar slams PM Modi Speech: लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस पक्षामुळेच पंतप्रधान मोदींना सर्व अधिकार मिळाले आहेत. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावर असल्याचे डीके शिवकुमार यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका करत हा जुना पक्ष भारतीय संविधानाचाच नव्हे तर स्वतःच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेचाही अनादर करत असल्याचा आरोप केला होता. संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चेत भाग घेतला होता. काँग्रेसने जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष म्हणून पक्षात घेण्यासाठी पक्षातील लोकशाही भावना बाजूला ठेवल्या होता असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आणि  कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाष्य केलं आहे. "पंतप्रधानांना हे माहित असले पाहिजे की काँग्रेसनेच त्यांना संविधानासह, राष्ट्रध्वजासह, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्यासह सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य मिळवून देऊन लोकशाही दिली असताना आता ते या देशाचे पंतप्रधान आहेत. संविधान नसते तर ते या देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते," असं डीके शिवकुमार म्हणाले. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ११ आश्वासनांवर बोलताना शिवकुमार यांनी "बघू या. या देशासाठी चांगल्याची आशा करूया," असं म्हटलं.

संविधानाचा अनादर केल्याचा आरोप करत मोदींनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकरा आश्वासनं दिली होती. "सरकारने आणि लोकांनी त्यांचे कर्तव्य बजावले पाहिजे आणि देशाचे राजकारण परिवारवाद पासून मुक्त झाले पाहिजे. आणीबाणीत देश तुरुंगात बदलला होता. नागरिकांचे हक्क हिरावले गेले आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर अंकुश ठेवला गेला होता. १९४७ ते १९५२ पर्यंत, भारतात कोणतेही निवडून आलेले सरकार नव्हते. परंतु एक सरकार होते ज्यामध्ये कोणत्याही निवडणुका झालेल्या नव्हत्या.१९५२ पूर्वी, राज्यसभेची स्थापना झाली नव्हती आणि कोणत्याही राज्याच्या निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे लोकांचा जनादेश नव्हता," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसParliamentसंसद