शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 21:23 IST

या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भोपाळ - मध्य प्रदेशात ज्या कफ सिरपमुळे २६ मुलांचा जीव गेला. त्यावरून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या औषध कंपनीवर सरकारने यासाठीच कारवाई केली नाही कारण या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत देणगी दिली जाते. या औषध कंपन्यांनी भाजपाला ९४५ कोटी देणगी दिली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, २ सप्टेंबरपासून आतापर्यंत २६ मुलांचा जीव कफ सिरप घेतल्याने गेला आहे. ज्यात डायएथलीन ग्लाइकॉलचं प्रमाण ४८.६ टक्के होते. याचे सुरक्षित प्रमाण ०.०१ टक्के इतके असायला हवे. आता तपासात जर सिरपमध्ये विषारी रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले असेल तर आरोग्य मंत्र्‍यांनी त्यांच्या पदावर का राहायला हवे? ज्या औषध कंपन्यांनी विषारी औषध विकले, त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला निवडणुकीत फंड दिला आहे. त्यामुळे त्यांना कारवाईपासून संरक्षण मिळत आहे. या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

इतकेच नाही तर ज्या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत फंड मिळाला, त्यातील ३५ कंपन्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये पात्र नाहीत. लोकांचा जीव आणि सुरक्षेशी खेळले जात आहे. सत्तेचे संरक्षण मिळल्याने कुणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला येत नाही. मुलांचा जीव घेणाऱ्या दोषी कंपन्यांवर आणि त्या विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केंद्र आणि राज्याकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशात औषधी लिहून देणाऱ्या 3 डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला अखेर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मात्र या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cough syrup deaths: Company donated ₹945 crore to BJP, alleges Singh.

Web Summary : Digvijay Singh alleges cough syrup company linked to 26 child deaths donated ₹945 crore to BJP via electoral bonds. He questions government inaction and demands accountability for substandard drugs, citing a deadly chemical imbalance in the syrup.
टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपा