शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेते दिल्लीत दाखल; पक्षश्रेष्ठींना आज भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 05:53 IST

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष थोरात

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते रविवारी दिल्लीत दाखल झाले. गेल्या २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर अद्यापही राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हिवाळी अधिवेशनासाठी सहा मंत्र्यांकडे विविध खात्यांचा तात्पुरता पदभार सोपविला आहे. मंत्रिमंडळाचा काही दिवसात विस्तार होईल. यात काँग्रेसचे ७ ते ८ सदस्य राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्रीद्वय पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांनीही दिल्ली गाठली आहे.

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष थोरात हे सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस आमदारांशी चर्चा केली आहे.राज्यात काँग्रेसचे ४४ आमदार असून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या दोघांना मंत्रीपद मिळाले आहे. पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांना स्थान दिल्यास नवोदितांना संधी मिळणार नाही. त्यामुळे या दोन ज्येष्ठ नेत्यांना वगळून मंत्रिमंडळात नवोदितांना अधिक स्थान द्यावे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. मात्र दोन्ही माजी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाल्याने ते मंत्रिमंडळात जाण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळाले आहेत.यांची नावे चर्चेतमंत्रीपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातministerमंत्री