शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता ISचा दहशतवादी, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 11:14 IST

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे. विजय रुपानी यांनी काँग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्‍लागार आणि राज्‍यसभा सदस्‍य अहमद पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''काँग्रेस नेता अहमद पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये ISचा दहशतवादी नोकरी करत होता'', असा गंभीर आरोप विजय रुपानी यांनी केला आहे. याप्रकरणी रुपानी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

25 ऑक्टोबरला 2 दहशतवाद्यांना अटक 

बुधवारी (25 ऑक्टोबर) गुजरात एटीएसनं आयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अनेक राजकिय नेते दौरे करत आहेत. यामुळे येथे मोठी सुरक्षा व्‍यवस्‍थाही तैनात करण्यात आली आहे. निवडणुकीआधीच एटीएसकडून सुरतमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांची कासीम व ओबैद अशी नावे असल्याचे एटीएस अधिकार्‍यांनी सांगितले. एटीएसच्या कारवाईमुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी अहमदाबादमध्ये मोठा हल्‍ला करण्याची तयारी केली होती. या दोघांनी अहमदाबादमधील धार्मिक स्‍थळ व इतर ठिकाणांची पाहणी केल्याचे तपासात समोर आले आहे.  

काँग्रेसनं आरोप फेटाळले

अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी अहमदाबादमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. यावर विजय रुपानी यांनी असा आरोप केला आहे की, 'दहशतवादी मोहम्मद कासीम ज्या भरुच हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता, त्या हॉस्पिटलचे कर्ताधर्ता अहमद पटेलच आहेत'. दरम्यान, 2014 मध्ये अहमद पटेल यांनी हॉस्पिटल प्रशासनकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचं काँग्रेस स्पष्टीकरण देत रुपानी यांचे आरोप फेटाळले आहेत. 

तर दुसरीकडे,  अहमद पटेल यांनी भाजपाचे आरोप पूर्णपणे निराधार असल्‍याचे सांगितले आहे. राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या मुद्यावर कुणीही राजकारण करू नये, अशी विनंती त्‍यांनी केली आहे. शिवाय, गुजरात एटीएसनं केलेल्या कारवाईबाबत त्यांचे अभिनंदन करतो आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

तर काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला म्‍हणाले आहेत की, 'भाजपा आणि गुजरातचे मुख्‍यमंत्री आपल्‍या अपयशांना झाकण्‍यासाठी अशा प्रकारचे बेफाम आरोप करत आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजपा हताश झाली आहे. 2014मध्ये अहमद पटेल यांनी संबंधित हॉस्पिटलकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे ते हॉस्पिटलशी जोडले गेलेले नाहीत' 

 

 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरातterroristदहशतवादी