सोशल मीडियावर काँग्रेसने उघडली मोदींविरुद्ध मोहीम
By Admin | Updated: December 8, 2014 01:56 IST2014-12-08T01:56:02+5:302014-12-08T01:56:02+5:30
पंजाबच्या नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात अनेक रुग्णांना आलेले अंधत्व, निर्गुंतवणूक अशा अनेक मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसने सोशल मीडियावरून मोर्चा उघडला आहे़

सोशल मीडियावर काँग्रेसने उघडली मोदींविरुद्ध मोहीम
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील अतिरेकी हल्ले, पंजाबच्या नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात अनेक रुग्णांना आलेले अंधत्व, निर्गुंतवणूक अशा अनेक मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसने सोशल मीडियावरून मोर्चा उघडला आहे़
टिष्ट्वटरवर विविध हॅशटॅगच्या माध्यमातून काँगे्रसने मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे़ ‘विकासाच्या नावाखाली मोदी पर्यावरण सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत आहे़ विकासासाठी कुठली किंमत मोजायची?’ अशा आशयाच्या मीडियातील बातम्याचे शीर्षकांना अधोरेखित करून काँग्रेस सरकारला लक्ष्य करीत आहे़ पक्षाच्या मते, लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सोशल मीडियावरील काँग्रेसविरोधी आक्रमक मोहीम उघडली होती़ या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले़ यामागच्या कारणांमध्ये हेही एक कारण होते़
मोदी सरकारच्या विविध मंत्रालयांच्या कामकाजावर टीका करणाऱ्या मीडियातील वृत्ताच्या आधारे मोदींना लक्ष्य करण्याचे काँंग्रेसचे मनसुबे आहेत़ यासाठी काँग्रेसने ‘शॅडो कॅबिनेट कमिटी’ गठित केली आहे़ यातील वादग्रस्त मुद्दे वा अयोग्य निर्णय सध्या काँग्रेस सोशल मीडियावर लावून धरत आहेत़ मीडियातील काही ‘हेडलाईन्स’ सध्या काँग्रेसकडून टिष्ट्वटरवर पुन्हा टाकण्यात येत आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)