‘भूसंपादना’वरून काँग्रेसवर निशाणा

By Admin | Updated: April 22, 2015 02:36 IST2015-04-22T02:36:02+5:302015-04-22T02:36:02+5:30

भूसंपादन अध्यादेशाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात दुष्प्रचार करणे म्हणजे सैतानाने प्रवचन देण्यासारखे आहे, अशी टीका भाजपने केली आहे

Congress on the 'Land Acquisition' | ‘भूसंपादना’वरून काँग्रेसवर निशाणा

‘भूसंपादना’वरून काँग्रेसवर निशाणा

जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
भूसंपादन अध्यादेशाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात दुष्प्रचार करणे म्हणजे सैतानाने प्रवचन देण्यासारखे आहे, अशी टीका भाजपने केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात सर्वाधिक अध्यादेश जारी करण्यात आल्याने आम्ही लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप ते करू शकत नाहीत, असेही भाजपने म्हटले आहे.
संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू म्हणाले की, काँग्रेसच्या मागील ५० वर्षांच्या कार्यकाळात ४५६ अध्यादेश जारी करण्यात आले. एवढ्या संख्येचा त्यांचा विक्रम असताना त्यांनी आमच्यावर टीका केली. यावरील राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे तर सैतानाचे प्रवचनच म्हटले पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात ७७ अध्यादेश, इंदिरा गांधी यांच्या काळात सुमारे ७७, तर राजीव गांधी यांच्या काळात ३५ अध्यादेश जारी केला. माकपसमर्थित संयुक्त आघाडी सरकारने ७७ अध्यादेश जारी केले होते. याचा अर्थ त्यांनी दर महिन्याला ३ अध्यादेश जारी केले होते. त्यांनी केवळ ६१ विधेयके पारित केली आणि अध्यादेश मात्र ७७ जारी केले. हेच लोक आज आमच्या अध्यादेश जारी करण्यावर टीका करीत आहेत. वास्तविक पाहता आम्ही अध्यादेश जारी करण्यापूर्वी विरोधी पक्षांशी विचारविनिमय केलेला आहे. नायडू यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत मागील सरकारांच्या अध्यादेशांची सविस्तर आकडेवारीच सादर केली.


 

Web Title: Congress on the 'Land Acquisition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.