शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

काँग्रेसचे ज्युनिअर मोदी म्हणतात... ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 05:40 IST

‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’... असा नारा देत हुबेहुब पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दिसणारे आणि मोदींच्याच आवाजात प्रचारसभेत भाषण करणारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील अभिनंदन पाठक मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मदतीला धावून आले आहेत.

- गजानन चोपडेजबलपूर : ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’... असा नारा देत हुबेहुब पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दिसणारे आणि मोदींच्याच आवाजात प्रचारसभेत भाषण करणारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील अभिनंदन पाठक मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मदतीला धावून आले आहेत. यापूर्वी छत्तीसगडच्या निवडणुकीत नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यासह १०० सभांमधून भाजपविरोधी आगपाखड केली होती.विशेष म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाठक यांनी वाराणसीत पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराची ९० दिवस धुरा सांभाळली होती आणि भाजपासाठी मते मागितली होती. मात्र काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन फोल ठरल्याने ते भाजपावर जाम संतापले आहेत. त्यामुळे भाजपावर तोंडसुख घेण्याची कुठलीही संधी ते सोडत नाहीत. अभिनंदन पाठक आता मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यांचा वापर काँग्रेस महत्त्वाच्या मतदारसंघात करत आहेत.खुद्द ‘ज्युनिअर मोदी’च संकटमोचक बनून आल्याने काँग्रेस कार्यकर्ते खूश आहेत. पाठक यांच्या मते वाराणसीत भाजपाच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्याना आधी सन्मानाची वागणूक मिळत होती. मात्र आता भाजपा व मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने तीच माणसे भाजपाचे नेते व कार्यकर्ते यांचा अपमान करतात. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्याची भाषा वापरणारे आता गरिबांना महागाईच्या गर्तेत ढकलू पाहत आहेत. भाजपाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी काँग्रेसने आपल्याला आमंत्रित केले नसून आपण स्वयंस्फूर्तीने मतदारांपर्यंत जात असल्याचे ते सांगतात. राज्यात २८ डिसेंबर रोजी मतदान आहे.

लाहोर का विकास करना है?भिंड जिल्ह्यातील लहार मतदारसंघात मुख्यमंत्री शिवाराज सिंग यांची सभा होती. भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करताना त्यांची जीभ घसरली आणि लहारऐवजी लाहोर असा उल्लेख केला. ते म्हणाले, लाहोर क्षेत्र का विकास ऐसा करना है की दुनिया देखती रह जाये’ विशेष म्हणजे त्यांची ही चूक कुणीही त्यांच्या लक्षात आणून दिली नाही. आता त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे. लाहोर या एका शब्दाने भाजपा कार्यकर्त्यांची टिंगल उडवली जात आहे. काँग्रेस कार्यकर्तेही हा व्हिडिओ विविध व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करीत आहेत.

पक्ष आणि उमेदवार सांगा, स्क्रिप्ट तयारमतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपा-काँग्रेससह अपक्ष उमेदवारही सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओ चालकांची तर चांगलीच कमाई होत आहे. फक्त पक्ष आणि उमेदवाराची माहिती द्या आणि प्रचाराची स्क्रिप्ट तयार. सिनेमातील गाण्याच्या चालीवर उमेदवाराचा प्रचार करणारे गीत तयार केले जाते. एका स्क्रिप्टसाठी १० ते ५० हजार रुपये मोजावे लागत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. जबलपूर शहरात तर रेकॉर्डिंग स्टुडिओ चालकांना सुगीचे दिवस आले आहेत.लाहोर का विकास करना हैछत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीतही अभिनंदन पाठक यांनी भाजपा उमेदवारांना घाम फोडला होता. मोदींसारखी वेशभूषा धारण करून त्यांच्या आवाजाची नक्कल करतात, तेव्हा उपस्थित लोकही संभ्रमात पडतात.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेस