झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो युती तुटली
By Admin | Updated: November 1, 2014 01:54 IST2014-11-01T01:54:52+5:302014-11-01T01:54:52+5:30
झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे.

झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो युती तुटली
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या झारखंडमध्ये सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल व जनता दल युनायटेडसोबत मिळून लढविण्याचा निर्णय घेतला आहे व झामुमोसोबतची युती तोडली आहे. बिहारमधील विधानसभेची निवडणूकही काँग्रेसने या दोन पक्षांसोबत लढविली होती. झारखंडमध्ये 81 सदस्यांच्या विधानसभेकरिता 25 नोव्हेंबर ते 2क् डिसेंबर या काळात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत.
काही समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे हरिप्रसाद यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसने 45 जागा मागितल्या होत्या व झामुमोला त्याच्या 36 जागांमधून दोन जागा राजद व जदयूला देण्यासाठी म्हटले होते.
निर्णय चुकीचा -झामुमो
काँग्रेसने झामुमोसोबतची युती तोडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेची निवडणूक अनुभवल्यानंतरही असा निर्णय घेणो हे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, तर झारखंड प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आलोक दुबे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
झामुमो आमच्याजवळ सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने आला होता. आमच्या अजेंडय़ात झारखंडचा विकास अंतभरूत आहे, झामुमोचा विकास नाही असेही दुबे यांनी पुढे स्पष्ट केले. ही युती तुटण्याचे संकेत 27 ऑक्टोबरच्या समितीच्या बैठकीत दिसले होते जेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)