शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

काँग्रेस धनशक्तीचे नाही, जनशक्तीचे नाव; खाती गोठवल्यानंतर राहुल गांधींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:59 IST

अपिलानंतर पुन्हा सक्रिय; पक्षाने म्हटले, वीज बिल, पगार देऊ शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २१० कोटी रुपयांचा आयकर परतावा मागत आयकर खात्याने काँग्रेस पक्षाची प्रमुख बँक खाती गोठवली होती. तथापि, नंतर आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने पुढील आठवड्यातील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ती वापरण्याची मुभा दिली. त्यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. खाती गोठवल्याने ऐन निवडणुकांची घोषणा होण्याच्या तोंडावर काँग्रेसची कोंडी झाली होती. न्यायाधिकरणाने आमच्या खात्यांवर ११५ कोटी रुपयांचा धारणाधिकार (परतफेडीपर्यंत हमी म्हणून रक्कम ताब्यात ठेवणे) ठेवला असून, पक्षाला त्यावरील रक्कम खर्च करण्याची मुभा दिली आहे, असे काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पक्षप्रमुख राहुल गांधी यांच्यासह पक्षांच्या अनेक नेत्यांनी याबाबत संताप व्यक्त करत सरकारचे हे पाऊल लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप केला आहे. 

काय आहे प्रकरण?n२०१८-१९ या निवडणूक वर्षातील २१० कोटी रुपयांच्या आयकर परताव्यासाठी पक्षाची खाती गोठविण्यात आली असून, त्यात भारतीय युवक काँग्रेसच्या खात्याचाही समावेश आहे. nपक्षाने संबंधित वर्षाचे आयकर विवरणपत्र काही दिवस उशिरा भरले व त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हे प्रकरण पक्षाचे आमदार व खासदारांनी त्यांच्या वेतनातून देणगी म्हणून दिलेल्या १४.४ लाख रुपयांच्या रोख पावत्यांशी संबंधित आहे. nमाकन म्हणाले, न्यायाधिकरणाने आम्हाला बँकांत ११५ कोटी रुपये हमी म्हणून ठेवावे लागतील, असे सांगितले.  यामुळे आम्ही कार्यालयांचे वीज बिल भरू शकत नाही आणि कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाही नाही.

काँग्रेस धनशक्तीचे नाही, जनशक्तीचे नाव : राहुल गांधी

केंद्र सरकारने घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस हे धनशक्तीचे नाही तर जनशक्तीचे नाव आहे... आम्ही हुकूमशाहीपुढे कधी झुकलो नाही आणि झुकणारही नाही. भारताच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आपादमस्तक लढेल,” असे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीIncome Taxइन्कम टॅक्स