शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे अन् विचारधारा कधीही मरत नाही’; काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:53 IST

माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या. 

नवी दिल्ली : काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि विचारधारा कधीही मरत नाही. आमची शक्ती कमी असू शकते, पण आमचा कणा अजूनही ताठ आहे. आम्ही राज्यघटनेशी कधी तडजोड केली नाही की धर्मनिरपेक्षतेशी ना गरिबांच्या हक्कांची. आम्ही सत्तेत नसू पण कधी सौदा करणार नाही, असे ठाम प्रतिपादन रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केले.  रविवारी काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन होता, या निमित्ताने पक्षाचे मुख्यालय इंदिरा भवन येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना खरगे यांनी काँग्रेसच्या थोर नेत्यांमुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही देश बनला. काँग्रेसने कधी धर्माच्या नावावर मते मागितली नाही की पक्षाने मंदिर-मशिदीच्या नावावर द्वेष पसरवला नाही. काँग्रेसने धर्माला श्रद्धा मानले, असे म्हटले.माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या. 

‘काँग्रेस भारताच्या आत्म्याचा आवाज’काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून भारताच्या आत्म्याचा आवाज आहे. हा पक्ष नेहमी कमकुवत, वंचित आणि कष्टकरी व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केले. काँग्रेस पक्षाचा संकल्प हा द्वेष, अन्याय आणि हुकूमशाहीच्या विरोधात सत्य, धैर्य आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्याचा आहे. काँग्रेसने राज्यघटनेचा पाया रचला आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समानतेची मूल्ये बळकट केली असे ते म्हणाले. 

थरूर यांचा दिग्विजय सिंह यांना पाठिंबाआरएसएस-भाजपच्या संघटन शक्तीचे कौतुक करून खळबळ उडवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या विचाराचे आपण समर्थन करत असून संघटन मजबूत झाले पाहिजे, अशी आपलीही भूमिका असल्याचे शशी थरूर यांनी रविवारी स्पष्ट केले.वर्धापनदिन कार्यक्रमात दिग्विजय सिंह यांच्या शेजारी थरूर बसले होते. त्यांना सिंह यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, संघटन मजबूत झाले पाहिजे यात शंकाच नाही असे ते म्हणाले. थरूर यांनी सोशल मीडियावर, ‘काँग्रेस हा १८८५ च्या पहिल्या अधिवेशनापासून देशाच्या लोकशाही प्रवासाचा व राजकीय उत्क्रांतीचा आधारस्तंभ राहिला आहे’, अशीही पोस्ट प्रसिद्ध केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Celebrates 140th Foundation Day: Ideology Never Dies, Says Kharge

Web Summary : Congress President Kharge affirmed the party's commitment to secularism and the constitution, celebrating its 140th anniversary. Rahul Gandhi emphasized Congress's support for the marginalized. Shashi Tharoor backed Digvijaya Singh's call for stronger party organization.
टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस