शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

काँग्रेसच्या उत्पन्नात १७१% वाढ; तरीही भाजपच ठरला अव्वल, ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 07:50 IST

भाजपने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,३४०.४७३ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले; परंतु त्यापैकी फक्त ५०.९६ टक्के म्हणजे २,२११.६९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

नवी दिल्ली : २०२३-२४ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपने सर्वाधिक उत्पन्न मिळविले असून, ते ४,३४०.४७ कोटी इतके आहे. सहा राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

भाजपने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,३४०.४७३ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले; परंतु त्यापैकी फक्त ५०.९६ टक्के म्हणजे २,२११.६९ कोटी रुपये खर्च केले आहेत. काँग्रेसचे एकूण उत्पन्न १,२२५.१२ कोटी रुपये होते, तर वर्षभराचा त्यांचा खर्च १,०२५.२५ कोटी रुपये किंवा एकूण उत्पन्नाच्या ८३.६९ टक्के होता, असे अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाचा मोठा भाग निवडणूक रोख्यांद्वारे, देणग्यांमधून आला आहे.

४,५०७.५६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले

एडीआरने दाखल केलेल्या आरटीआय अर्जाच्या उत्तरात स्टेट बँक ऑफ इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ आर्थिक वर्षात विविध राजकीय पक्षांनी ४,५०७.५६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले आहेत.  या रकमेपैकी ५५.९९ टक्के हा राष्ट्रीय पक्षांचा वाटा होता.

पक्ष    एकूण उत्पन्न  केलेला खर्च    शिल्लक रक्कम

भाजप  ४३४० कोटी    २२११ कोटी    ४९.०४%

काँग्रेस  १२२५ कोटी    १०२५ कोटी    १६.३१%

माकप  १६७ कोटी     १२७ कोटी     २४.०७%

बसपा  ६४ कोटी      ४३ कोटी      ३३.३३%

आप   २२ कोटी      ३४ कोटी      -५०%

पक्षांना सर्वाधिक पैसे कुठून मिळाले?

भाजप  स्वेच्छेने देणगी       ३,९६७ कोटी    ९१%

काँग्रेस  अनुदान, देणग्या      १,१२९ कोटी    ९२%

माकप  अनुदान, देगण्या      ७४ कोटी      ४४%

बसपा शुल्क व सदस्यत्व     २६ कोटी      ४१%

आप   अनुदान       २२ कोटी      ९७%

कोणत्या पक्षाचे उत्पन्न वाढले?

आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ दरम्यान भाजपच्या उत्पन्नात ८३.८५ टक्क्यांची (१९७९ कोटी) वाढ झाली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या उत्पन्नातही ४५२ कोटी रुपयांवरून १२२५ कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १७१ टक्के इतकी वाढ झाली आहे.

माकपच्या उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ आहे. आप आणि बसपाच्या उत्पन्नात मात्र अनुक्रमे २४ आणि २३ टक्के घट झाली आहे.

भाजप निवडणूक/सामान्य प्रचार १,७५४ कोटी

काँग्रेस निवडणूक खर्च ६१९ कोटी

माकप प्रशासकीय खर्च ५६ कोटी

बसपा निवडणूक खर्च २३ कोटी

आप प्रचार खर्च १९ कोटी

भाजप निवडणूक/सामान्य प्रचार १,७५४ कोटी

काँग्रेस निवडणूक खर्च ६१९ कोटी

माकप प्रशासकीय खर्च ५६ कोटी

बसपा निवडणूक खर्च २३ कोटी

आप प्रचार खर्च

१९ कोटी

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस