शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची १२ डिसेंबरला ‘महागाई हटाओ रॅली’, सोनिया, राहुल यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 12:47 IST

संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

शीलेश शर्मा -

नवी दिल्ली : महागाईविरुद्धकाँग्रेस देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत अंतिम टप्प्यात नवी दिल्लीत महारॅली आयोजित करणार आहे. १२ डिसेंबर रोजी एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असताना दुसरीकडे काँग्रेसची दिल्लीत महारॅली निघणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी संबोधित करणार आहेत.  काँग्रेसचे संघटन प्रभारी महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली. 

संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.  

वेणुगोपाल म्हणाले...- या महारॅलीला महागाई हटाओ रॅली असे नाव देण्यात आले आहे. याची घोषणा करताना के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या काळातील महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. प्रत्येक कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. मात्र, मोदी सरकार डोळेझाक करत आहे. - लोकांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार मीडियातील एका वर्गाची मदत घेऊन जनतेच्या महत्त्वपूर्ण मुद्यांवरुन लक्ष धार्मिक आदी मुद्यांकडे भटकाविण्याचा प्रयत्न करत आहे. - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आवाहनावर काँग्रेस पक्ष या विषयावर आपला विरोध दर्शवित आहे. हे मुद्दे आम्ही संसदेत आणि बाहेर उपस्थित करत राहू.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसInflationमहागाईSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी