शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर; देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 06:01 IST

राजधानीत प्रियांकांच्या नेतृत्वात आंदाेलन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी देशव्यापी ‘संकल्प सत्याग्रह’ केला. हिमाचल प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि गुजरातसारख्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

गुजरातमध्ये पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. श्रीनगरमध्ये, जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे (जेकेपीसीसी) माजी अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एमए रोडवरील पक्षाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. पंजाब आणि हरयाणातही ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात आला. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसने जयपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह केला.

शहीद पंतप्रधानांचा मुलगा देशाचा अपमान करू शकत नाही

माझ्या कुटुंबाने रक्त सांडून देशात लोकशाही जतन केली. लोकशाहीसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. काँग्रेसच्या महान नेत्यांनी लोकशाहीचा पाया रचला. हा त्या पंतप्रधानांचा अपमान आहे, ज्यांनी आपले प्राण दिले. संसदेत पंतप्रधान विचारतात की, हे कुटुंब नेहरू आडनाव का वापरत नाही? तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा व काश्मिरी पंडितांच्या परंपरेचा अपमान केला. आजपर्यंत त्यांनी आमच्या कुटुंबाचा अपमान केला, आम्ही गप्प होतो पण आता गप्प बसणार नाही.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर अपडेट केले ‘अपात्र खासदार’ लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवर आपली माहिती अपडेट करत स्वत:चे वर्णन ‘अपात्र खासदार’ असे केले. त्यांनी त्यांच्या अधिकृत वायनाड ट्विटर अकाउंटवर ‘अपात्र खासदार’ असे लिहिले.

मध्य प्रदेशात ‘रेल रोको’मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत भुरिया यांना रविवारी भोपाळमधील कमलापती रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ करण्यात आला. त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस