काँग्रेसने जे 15 वर्षांत केले नाही ते 15 महिन्यांत करू - पंतप्रधान मोदी

By Admin | Updated: February 25, 2017 14:48 IST2017-02-25T14:46:27+5:302017-02-25T14:48:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विविध मुद्यांवरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

The Congress has not done anything in 15 years - in 15 months - PM Modi | काँग्रेसने जे 15 वर्षांत केले नाही ते 15 महिन्यांत करू - पंतप्रधान मोदी

काँग्रेसने जे 15 वर्षांत केले नाही ते 15 महिन्यांत करू - पंतप्रधान मोदी

 ऑनलाइन लोकमत

इम्फाळ, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विविध मुद्यांवरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस 15 वर्षांपासून सत्तेत आहे. तुम्हाला कोणते काम केलेले दिसते का? काँग्रेसने मणिपूरला बर्बाद केले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला टार्गेट केले. 
 
शनिवारी इम्फाळ येथे घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.  जे काम काँग्रेसने 15 वर्षात केले नाही ते काम भाजपाचे सरकार 15 महिन्यांमध्ये करुन दाखवेल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी जनतेला दिले.  यावेळी त्यांनी मणिपूर बंदचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला. 'निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस मणिपूर बंदच्या समर्थकांसोबत मिळाली आहे.  काँग्रेसचे सरकार जाणूनबुजून हा वाद निर्माण करत आहे. शिवाय काँग्रेस पैस देऊन मणिपूर बंद करत आहे', असा घणाघातही मोदींनी यावेळी केला.  
(...तर जनता काँग्रेसला माफ करणार नाही - गुरुदास कामत)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेपूर्वी येथील 6 उग्रवादी संघटनांच्या समन्वय समितींनी बंदचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  
बंद भडकलेल्या पंतप्रधानांनी 'मणिपूर बंद हे सरकारच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे. बंदमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. 11 मार्चला निवडणुकीचे निकाल येतील, 13 मार्चला देश होळीचा उत्सव साजरा करेल.
(नेत्यांऐवजी 70 हजारहून अधिक मुंबईकरांची 'नोटा'ला पसंती)
 
भाजपाचे सरकार येईल आणि होणारे हे बंद संपुष्टात येतील', असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील जनतेला दिला.यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराचाही मुद्दा मांडला. 'मणिपूरमधील लोकांना प्रत्येक कामासाठी पैसे द्यावे लागतात', असे सांगत त्यांनी काँग्रेसचा भ्रष्टाचारावरुन समाचार घेतला.   

Web Title: The Congress has not done anything in 15 years - in 15 months - PM Modi