शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Elections : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार, मुलांसोबत प्रचार केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 10:30 IST

Gujarat Assembly Elections : रिवाबा यांच्यावरील आरोपांदरम्यान रवींद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबा यांना लक्ष्य केले आहे. 

अहमदाबाद : क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा विरोधात निवडणूक आयोगाकडे (EC) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलांसोबत निवडणूक प्रचार केल्याचा आरोप रिवाबा यांच्यावर आहे. काँग्रेस नेते सुभाष गुजराती यांनी मंगळवारी ही तक्रार केली आहे. दरम्यान, रिवाबा यांच्यावरील आरोपांदरम्यान रवींद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबा यांना लक्ष्य केले आहे. 

रिवाबा निवडणूक प्रचारात मुलांचा वापर करत आहे. हे स्पष्टपणे बालमजुरीचे प्रकरण आहे, असे नयनाबा यांनी म्हटले आहे. तसेच, रिवाबा जामनगर उत्तरमधून उमेदवार आहेत, तर त्या स्वत: राजकोट पश्चिमच्या मतदार आहेत. त्यांनी तेथून निवडणूक लढवावी. जामनगरमध्ये रिवाबा कुठल्या अधिकाराने मते मागत आहेत, तर इथले प्रश्नही त्यांना माहीत नाहीत, असे नयनाबा यांनी सांगितले.

लग्नानंतरही नाव बदलले नाहीलग्नानंतरही रिवाबा यांनी नाव बदलले नसल्याचा दावाही नयनाबा यांनी केला आहे. रिवाबा अजूनही आपले पूर्ण नाव रिवा सिंग हरदेव सिंग सोलंकी लिहिते. तसेच, रिवाबा या रवींद्र जडेजाचे नाव कंसात लिहितात. त्या फक्त रवींद्र जडेजाचे नाव वापरत आहेत, असेही नयनाबा यांनी म्हटले आहे.

भाजपकडून रिवाबा यांना उमेदवारीभाजपने जामनगर उत्तरमधून रिवाबा यांना उमेदवारी दिली आहे. 14 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेकडो समर्थकांसह जामनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन म्हणून, भाजपने रिवाबा यांच्या समर्थनार्थ एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित केला होता. या कार्यक्रमात रिवाबा यांचे पती रवींद्र जडेजा देखील सहभागी झाले होते. रिवाबा यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार असल्याची चर्चा फार पूर्वीपासून होती. जामनगरमधील भाजपशी संबंधित राजकीय कार्यक्रमांमध्ये त्या अनेकदा दिसल्या आहेत. त्या सौराष्ट्र करणी क्षत्रिय सेनेच्या अध्यक्षाही होत्या. 

नयनाबा-रिवाबा यांच्यातील राजकीय वादाची चर्चारिवाबा यांचे जामनगरशी विशेष नाते आहे, कारण त्यांचा बहुतांश वेळ राजकोट आणि जामनगरमध्येच गेला आहे. जडेजाची बहीण नयनाबा जडेजा सध्या जामनगरमध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. अशा स्थितीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या सहभागामुळे नणंद आणि भावजय (नयनाबा आणि रिवाबा आणि) यांच्यातील वादाची चर्चाही चव्हाट्यावर येत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये मास्क न घालण्यावरून नयनाबा आणि रिवाबा यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाले होते.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ravindra jadejaरवींद्र जडेजाBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग