शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 13:50 IST

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी काँग्रेसने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघ्या आठवड्या भराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी काँग्रेसने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऐन मतदानापूर्वी पक्षविरोधी भूमिका घेत समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या मुलाचा प्रचार करण्याची घोषणा करणारे ज्येष्ठ नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांचीही काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आतापर्यंत एकूण 17 नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र सत्यव्रत चतुर्वेदी यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पक्षाचे आभार मानले आहेत.  मध्य प्रदेशमध्ये पक्षातिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करून आपल्याच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. या बंडखोरांची नाराजी दूर करताना तसेच त्यांच्यावर कारवाई करताना  दोन्ही पक्षांच्या नाकी नऊ येत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आणि महासचिव म्हणून काम पाहणाऱ्या सत्यव्रत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे मुलासाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र त्याला तिकीट नाकारण्यात आले. दरम्यान, सत्यव्रत चतुर्वेदी यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले होता. चतुर्वेदी यांची समजूत घालण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र त्यात फारसे यश आले नव्हते. 

चतुर्वेदी यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या मुलाचा प्रचार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. काँग्रेसचे आठ नेते इतर पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. तर 12 जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरांचे मन वळविण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. असे असले तरी पक्षातील बंडखोर नेत्यांनी उज्जैन उत्तर, दक्षिण, झाबुआ, बालाघाट, महिदपूर येथे काँग्रेस उमेदवारांना अडचणीत आणले आहे. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसPoliticsराजकारण