काँग्रेसने केली आरएसएसची तुलना मुस्लिम लीगशी

By Admin | Updated: April 18, 2016 08:30 IST2016-04-18T08:30:09+5:302016-04-18T08:30:09+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जातीय द्वेष पसरवत असून फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मोहसीना किडवाई यांनी केला आहे

Congress has compared RSS to comparisons with Muslim league | काँग्रेसने केली आरएसएसची तुलना मुस्लिम लीगशी

काँग्रेसने केली आरएसएसची तुलना मुस्लिम लीगशी

>ऑनलाइन लोकमत - 
लखनऊ, दि. १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जातीय द्वेष पसरवत असून फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मोहसीना किडवाई यांनी केला आहे. मोहसीना किडवाई यांनी आरएसएसची तुलना मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगशी केली आहे. 'मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगमुळे 1947मध्ये भारताची फाळणी झाली, तर आरएसएस जातीय द्वेषाच्या आधारे देशाची फाळणी करत आहे', असं  मोहसीना किडवाई यांनी म्हटलं आहे. भीम ज्योती यात्रा कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मोहसीना किडवाई यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी भीम ज्योती यात्रा सोनिया गांधी आणि राहुल गांधींमुळेच यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. 'बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी घेतला. काँग्रेस कार्यालयातून ही बातमी बाहेर पडल्यावर भाजपला जाग आली', असल्याचं म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी भाजपला टोमणा मारला आहे. 
 

Web Title: Congress has compared RSS to comparisons with Muslim league