काँग्रेसचे 142 उमेदवार ठरले
By Admin | Updated: September 21, 2014 03:15 IST2014-09-21T03:15:28+5:302014-09-21T03:15:28+5:30
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने या निवडणुकीसाठी पक्षाच्या 142 उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे समजते.

काँग्रेसचे 142 उमेदवार ठरले
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची निर्णायक बोलणी करण्याचे निर्देश काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी आपले राजकीय सचिव अहमद पटेल यांना दिलेले असतानाच काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने या निवडणुकीसाठी पक्षाच्या 142 उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे समजते.
काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रंनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचा अंतिम निर्णय होईर्पयत सध्या 142 मतदारसंघांचे उमेदवार पक्षाने ठरवावेत व बाकीच्या उमेदवारांच्या नावांवर आघाडीचे नक्की झाल्यावर विचार करावा, अशी स्पष्ट भूमिका सोनिया गांधी यांनी निवडणूक समितीच्या बैठकीची अध्यक्षता करताना मांडली. बैठकीला सोनिया गांधी यांच्याखेरीज अहमद पटेल, वीरप्पा मोईली व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याखेरीज इतर नेतेही हजर होते. जागावाटपाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी आतार्पयत झालेल्या चर्चेची माहिती अहमद पटेल यांनी बैठकीत दिली. सूत्रंनुसार 142 नावे नक्की केल्यावर सोनिया गांधी यांनी अहमद पटेल यांना राष्ट्रवादीशी निर्णायक चर्चा करण्याचे निर्देश दिले व बाकीच्या मतदारसंघांतील उमेदवारांवर निवडणूक समितीने तोर्पयत कोणताही निर्णय घेऊ नये, असे सांगितले.
युतीनंतरच ‘आघाडी’
च्‘युती’वर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीला अंतिम रूप येणार आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या 124 जागांच्या प्रस्तावाला प्रतिसाद द्यायचा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविल्याचे सूत्रंचे म्हणणो
आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रतिसादाची दोन दिवस वाट बघायची असे काँग्रेसने ठरविले आहे.
मुख्यमंत्री कुठून लढणार?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढविणार काय? लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून? याचे उत्तर त्यांनी टाळले. सातारा जिल्ह्याच्या दक्षिण कराडमधून लढणार असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले असले तरी तर्कवितर्क सुरूच आहेत.