काँग्रेसचा सरकारवरील हल्ला तीव्र

By Admin | Updated: October 30, 2014 00:37 IST2014-10-30T00:37:07+5:302014-10-30T00:37:07+5:30

केंद्र सरकारला विदेशी बँकांमध्ये खाती असणा:यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतानाच भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला मूर्ख बनविले होते,

The Congress government's attack was intense | काँग्रेसचा सरकारवरील हल्ला तीव्र

काँग्रेसचा सरकारवरील हल्ला तीव्र

नवी दिल्ली : केंद्र सरकारला विदेशी बँकांमध्ये खाती असणा:यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतानाच भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला मूर्ख बनविले होते,असा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. तसेच काळा पैसा परत आणण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? असाही या पक्षाचा सवाल आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काळ्या पैशाच्या मुद्यावर मोठमोठी आश्वासने देणा:या सत्ताधारी पक्षावर टीका करताना काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की, 55 हजार खातेधारकांची नावे उघड करण्याची प्रतिज्ञा या पक्षाने घेतली होती. परंतु सत्तारूढ होऊन पाच महिने लोटून गेल्यानंतर 55 रुपयेसुद्धा आले नाहीत. 
भाजपाने मात्र विदेशी बँकांमधील काळा पैसा देशात परत आणण्याबाबत सरकारची वचनबद्धता कायम असून त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. सरकारने बुधवारी जिनिव्हा येथील एचएसबीसी बँकेत खाती असणा:या 627 भारतीयांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली. त्याअनुषंगाने काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली आहे. 
कुठल्याही राजकीय पक्षाने एखाद्या गोष्टीचे श्रेय लाटण्यासाठी देशाची दिशाभूल करणो अत्यंत चुकीचे असल्याचे प्रतिपादन सिंघवी यांनी केले. सरकारची आजची कार्यवाहीसुद्धा न्यायालयाच्या आदेशानंतरची आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आमच्याजवळ नावे आली तर आम्ही ती नक्की जाहीर करू आणि शंभर दिवसांच्या आत काळा पैसा परत आणू,असे आश्वासन भाजपा गेल्या पाच वर्षापासून देत आली आहे. 
4आता तिने आपला शब्द पाळला पाहिजे. लालकृष्ण अडवाणी यांनी 2क्11 मध्ये काळ्या पैशावर एक स्थगन प्रस्ताव आणला होता. त्यामुळे सरकारने विदेशी खातेधारकांची नावे त्वरित जाहीर केली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.
 
4सरकार या मुद्याबाबत संवेदनशील असून प्रामाणिकपणो कारवाई करीत आहे. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे, असे मुख्तार अब्बास नकवी (उपाध्यक्ष,भाजपा) यांनी सांगितले.

 

Web Title: The Congress government's attack was intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.