शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Congress Files: ४.८२ लाख कोटींचा गोलमाल, भाजपाने प्रसिद्ध केली काँग्रेसच्या सत्ताकाळातील घोटाळ्यांची यादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 19:49 IST

Congress Files: भाजपाने काँग्रेस फाईल्स नावाने एक व्हिडीओ सिरीज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भाजपाने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील कथित हितसंबंधांवरून गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपानेही आता काँग्रेसवर जोरदार प्रत्यारोप केले आहेत. भाजपानेकाँग्रेस फाईल्स नावाने एक व्हिडीओ सिरीज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भाजपाने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपाकडून ट्विटरवर हा तीन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करून काँग्रेसच्या काळात एकूण 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात झालेला कोळसा घोटाळा, २जी स्कॅम, कॉमनवेल्थ गेम घोटाळा आदींचा उल्लेख करण्यात आला आहे. 

भाजपाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसच्या सत्ताकाळात ४८ खर्व, २० अब्ज, ६९ कोटी रुपयांची लूट करण्यात आली. या व्हिडीओमध्ये कोळसा घोटाळ्यापासून, २-जी घोटाळ्यापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ४८ खर्व, २० अब्ज, ६९ कोटी रुपये हे देशाच्या सुरक्षेपासून विकासयोजनांपर्यंत विविध कामांसाठी वापरता आले असते. एवढ्या पैशांमध्ये २४ आएयएनस विक्रांत, ३०० राफेल विमाने आणि  एक हजार मंगळ मोहिमा आखता आल्या असत्या. काँग्रेसने केलेल्या घोटाळे आणि भ्रष्टाचाराची किंमत देशाला मोजावी लागली. आपला देश प्रगती आणि उन्नत्तीच्या मार्गावर काँग्रेसमुळे पिछाडीवर राहिला, असा आरोपही भाजपाने केला. 

दरम्यान, या व्हिडीओच्या अखेरीस काँग्रेसच्या घोटाळ्यांची ही केवळ झलक आहे. संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, काँग्रेस म्हणजे करप्शन च्या पुढच्या भागात पाहा, पेंटिंगची किंमत २ कोटी रुपये होती. त्या दोन कोटी रुपयांसाठी गांधी कुटुंब धमकीही देत होतं, असा आरोपही भाजपाकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाCorruptionभ्रष्टाचार