शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 11:52 IST

Lok Sabha Election 2024 : व्हिडीओमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Congress Complaint Against BJP : कर्नाटक भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओबाबत काँग्रेसने भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपा अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

व्हिडीओमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपा कर्नाटकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कथितरित्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या (एससी-एसटी)  लोकांना धमकावले आहे की, त्यांनी एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मतदान करू नये. एससी/एसटी समुदायाच्या सदस्यांविरुद्ध शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले आहे. 

पत्रात पुढे म्हटले आहे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना व्हिडिओमध्ये ॲनिमेटेड पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. इतकंच नाही तर दोन्ही नेत्यांच्या मदतीने असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, काँग्रेस पक्ष एका विशिष्ट धर्माच्या लोकांची बाजू घेत आहे आणि एससी/एसटी आणि ओबीसी समाजाच्या सदस्यांना दडपत आहे. 

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया आणि कम्युनिकेशन हेड रमेश बाबू यांनी हे पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी भाजपाने पोस्ट केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. तसेच, असा व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. भाजपा आणि अमित मालवीय नेहमीच अशा द्वेषपूर्ण पोस्ट टाकत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक भाजपाने शनिवारी (४ मे) संध्याकाळी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवरून आता सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाsiddaramaiahसिद्धरामय्याkarnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४