गोव्यात महाआघाडीसाठी काँग्रेस अनुकूल

By Admin | Updated: November 16, 2015 03:06 IST2015-11-16T03:06:23+5:302015-11-16T03:06:23+5:30

कॉँग्रेस पक्ष महाआघाडीच्या विरोधात नाही. मात्र, गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपाशी संधान बांधलेल्या व भाजपाची बी टीम असलेल्या पक्षांशी, तसेच अपक्षांशी महाआघाडी करणार नाही.

Congress is favorable for bigger accidents in Goa | गोव्यात महाआघाडीसाठी काँग्रेस अनुकूल

गोव्यात महाआघाडीसाठी काँग्रेस अनुकूल

मडगाव (गोवा) : कॉँग्रेस पक्ष महाआघाडीच्या विरोधात नाही. मात्र, गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपाशी संधान बांधलेल्या व भाजपाची बी टीम असलेल्या पक्षांशी, तसेच अपक्षांशी महाआघाडी करणार नाही. कॉँग्रेस गोव्यातील धर्मनिरपेक्ष लोकांशी महायुती करून येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला त्याची जागा दाखवून देण्यास सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी येथे केले.
येथे काँग्रेसने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात सहिष्णुतेची शपथ या सभेत घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, रवी नाईक, प्रतापसिंग राणे व दिगंबर कामत हे काँग्रेसचे पाच माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congress is favorable for bigger accidents in Goa