शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:36 IST

शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती.

- असिफ कुरणेशेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजीहोती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती. पण भाजपाने आपली मध्य प्रदेशात अजूनही पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले.१५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाविरोधात काँग्रेसने निवडणुकीच्या वर्षभर आधी तयारी सुरू केली होती. दिग्विजय सिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, सुरेश पचौरीसारख्या ज्येष्ठ नेत्यांमधील वाद मिटवत त्यांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. तिकीटवाटपाचे नियोजन करत बंडखोरी टाळण्यात काँग्रेसने यश मिळवले होते. त्याचा फायदा पक्षाला झाला. चंबळ, माळवा भागात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. काँग्रेस या निवडणुकीत जवळपास ८० जागा नव्याने पटकावण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. यातील ७७ जागा या भाजपाच्या आहेत. ग्रामीण जनतेमध्ये असलेला असंतोष काँग्रेसने बरोबर मतपेटीपर्यंत आणला. जवळपास ४८ जागा या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातून मिळाल्या आहेत.शिवराज सिंह चौहान यांनी सरकारविरोधातील नाराजीचा फार मोठा फटका बसणार नाही यासाठी परिश्रम घेतले. विरोधकांचा एकहाती सामना करत सत्ता कायम ठेवण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर माळवा, बालाघाट परिसरात भाजपाला चांगले यश मिळाले. शहरी मतदारांनी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना साथ दिल्याचे चित्र दिसत होते. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मंत्री, आमदार, नेते पराभवाच्या छायेत होते. शिवराज सिंह यांच्या कामामुळे भाजपाची फारशी वाताहत झाली नाही.निकालाची कारणे...निवडणूक एवढी अटीतटीची होती की जवळपास ७८ उमेदवार २००० पेक्षा कमी मतांनी विजयी झाले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत विजयाचे पारडे वरखाली होत होते.भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांची सक्षम फळी मतांची बेगमी करण्यात कामी आली. विकासाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची गरज होती.शिवराज सिंह चौहान सरकारमधील ९ पेक्षा जास्त मंत्री पिछाडीवर किंवा पराभवाच्या छायेत उभे आहेत.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानRahul Gandhiराहुल गांधी