शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे 'जय रघुराम'... लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्यासाठी राजन मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 17:39 IST

राहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती.

ठळक मुद्दे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही शेतकरी आणि रोजगार हे दोन मुद्दे काँग्रेसच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. रोजगार उपलब्धी आणि कृषी विकासासंदर्भात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेसला मदत करणारराहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती.

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस जनतेला आकर्षित करण्यासाठी नवनवी आश्वासनंही देत आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सत्ताधारी भाजपाला रोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक सभांमधून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही हे दोन मुद्दे काँग्रेसच्या केंद्रस्थानी राहणार आहेत.रोजगार उपलब्धी आणि कृषी विकासासंदर्भात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस याच मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतःच्या रॅलींमध्ये रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत आहेत. या प्रश्नांच्या आडून ते मोदी सरकारवर निशाणाही साधत आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. राजन यांनी यासंदर्भात एक सखोल अहवाल तयार केला असून, त्याचा काँग्रेस पक्ष स्वतःच्या जाहीरनाम्यात वापर करणार आहे. रघुराम राजन हे यूपीए 2 सरकारमध्ये ऑगस्ट 2012 ते सप्टेंबर 2013पर्यंत आर्थिक सल्लागार होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी एक कमिटी तयार केली आहे.या कमिटीची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याशिवाय सॅम पित्रोदा आणि शशी थरूर यांनाही या कमिटीमध्ये महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रघुराम राजन यांनी मोदी सरकारनं केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती. त्यावेळी एनडीएच्या कार्यकाळात रघुराम राजन यांना नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी मोदी सरकारला असं न करण्याचा इशारा दिला होता. तसेच या निर्णयाचा काहीही फायदा होणार नसल्याचंही त्यांनी त्यावेळी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सांगितलं होतं. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९