शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुण्यांसोबत डिनरचे निमंत्रण नसल्याने काँग्रेसची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 05:50 IST

लोकशाही व विरोधक नसलेल्या देशात हे घडू शकते : काँग्रेस

आदेश रावल नवी दिल्ली : जी-२०च्या निमित्ताने जगभरातील सर्व नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले असताना काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना डिनरचे निमंत्रण न दिल्याने काँग्रेस नाराज आहे. 

काँग्रेसने म्हटले आहे की, आम्ही लोकशाही देशाच्या सरकारची कल्पना करू शकत नाही की, जिथे जागतिक नेत्यांसाठी आयोजित डिनरला विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जात नाही. यावर भाजपने म्हटले आहे की, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाही निमंत्रण नव्हते. खरगे हे काँग्रेस अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही नव्हते.

डिनरला कोण येणार? : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन डिनरला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसशासित चार राज्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सिद्धरामय्या आणि सुखविंदर सिंह सुक्खू यांना आमंत्रणे मिळाली; पण ते उपस्थित राहणार नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे जी-२० शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांचे स्वागत केले. मोदी ज्या ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत करत होते, त्या ठिकाणच्या पार्श्वभूमीवर कोणार्क मंदिराचे सूर्यचक्र होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तेथे पोहोचल्यावर मोदींनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी बायडेन यांची नजर चक्रावर पडताच पंतप्रधानांनी त्यांचा हात धरला आणि सूर्यचक्राबद्दल सांगायला सुरुवात केली. बायडेनही त्यांचे म्हणणे ऐकताना दिसले. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेG20 Summitजी-२० शिखर परिषद