शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला युपीमध्ये प्रदेशाध्यक्ष मिळेना; प्रियांका गांधी यांची ऑफर पाच नेत्यांनी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:22 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.

आदेश रावल -नवी दिल्ली :काँग्रेसच्याउत्तर प्रदेश प्रभारी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना प्रदेशाध्यक्ष मिळत नाही. त्यांनी पाच नेत्यांना प्रदेशाध्यक्ष होण्याचा प्रस्ताव दिला, परंतु सर्वांनी नकार दिला. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. मात्र, ती जबाबदारी घेण्यास एकही नेता तयार नसल्याचे चित्र उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.१० मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. काँग्रेसचा या पाचही राज्यांत पराभव झाला. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात लढविली होती. उर्वरित चार राज्ये पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर येथेही काॅंग्रेसला अपयशच हाती आले हाेते. त्यानंतर तेथील प्रदेशाध्यक्ष तातडीने बदलण्यात आले. परंतु उत्तर प्रदेशबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राज्यात पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते. यातील एक आमदार आराधना मिश्रा (मोना) या प्रमोद तिवारी यांच्या भगिनी असून, त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात आले. दुसरे आमदार वीरेंद्र चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष होण्यास नकार दिला. त्यामुळे या पदावर कोणाची निवड करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी या नेत्यांचा नकार -माजी राज्यसभा सदस्य व छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया, राजस्थानमधून नुकतेच राज्यसभेसाठी निवडले गेलेले प्रमोद तिवारी, माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री, माजी विधिमंडळ नेते प्रदीप माथूर व आ. वीरेंद्र चौधरी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सर्वांनी नकार दिला. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश