शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे फलक हटविण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 03:44 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे फलक काढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसने निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले व त्यांच्या सरकारची कामगिरी सांगणारे फलक देशभरात मुख्यत्वे पेट्रोलपंपांनजीक लावलेले आहेत. निवडणूक कार्यक्रम आयोगाने लागू केल्यानंतर लगेचच आचारसंहिताही लागू झाली. तिचा भंग होत असल्याने हे फलक तातडीने काढून टाकणे आवश्यक आहे. असे फलक झळकविणे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टीही आहे. मोदी निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा व पैसे वापरत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार, राजकीय पक्षांवरही अनेक बंधने येतात.आचारसंहितेचा बडगा लक्षात घेऊन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नईहून दिल्लीला परत येताना विशेष विमानाचा वापर करणे टाळले होते. त्यांनी खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास केला. या दक्षतेबद्दल त्यांचे सर्वांनीच कौतुक केले होते.आचारसंहितेआधी लावले फलकमोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवडे आधीच झळकविण्याचा चाणाक्षपणा दाखविण्यात आला होता. त्या वेळी आक्षेप घेता न आलेल्या काँग्रेसने आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र हा मुद्दा धसास लावण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग