शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आसाम, केरळमध्ये काँग्रेसचा परा‌भव अंतर्गत गटबाजीमुळे, सत्यशोधन समितीच्या अहवालाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 06:14 IST

Congress : समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, ‘वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या निराधार आहेत. या बातम्यांत आसाममध्ये झालेल्या पराभवाला बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती जबाबदार असल्याचे म्हटले.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : आसाम आणि केरळसारख्या राज्यांत काँग्रेसचा अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे पराभव झाला, असा खुलासा समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. ही समिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्थापन केली होती.समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, ‘वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या निराधार आहेत. या बातम्यांत आसाममध्ये झालेल्या पराभवाला बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती जबाबदार असल्याचे म्हटले. वस्तुस्थिती ही आहे की, राज्यस्तरावर नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीने कार्यकर्त्यांची गटागटांत विभागणी झाली. त्यांच्यात कोणताही समन्वय नव्हता. एआययूडीएफशी काँग्रेसने जर युती केली नसती तर पक्षाची कामगिरी आणखी वाईट झाली असती.’ केरळी चर्चा करताना हा सदस्य म्हणाला की, राहुल गांधी यांची उपस्थिती असतानाही ओमान चंडी तथा रमेश चेन्नीथला यांच्यात गटबाजी झाली. ते एक दुसऱ्याचे नुकसान करू लागले. 

नेते काय म्हणतात?पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की, ‘अंतर्गत गटबाजी काही नवी नाही; परंतु सत्तेतून दूर झाल्यामुळे प्रत्येक राज्यात गटबाजीने वेग घेतला आहे. हार्दिक पटेल यांनी याच गटबाजीमुळे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धमकी पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगडसह सर्व राज्यांत काँग्रेसमध्ये गट-तट आहेत. परंतु, नेतृत्व त्यावर उपाय शोधू शकले नाही. त्यामुळे गटबाजी वाढत आहे.’

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक