शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचं ठरलं ! हंगामी अध्यक्ष म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 19:41 IST

काँग्रेसचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची मनधरणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची निवड झाली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

काँग्रेसचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची मनधरणी करणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या पुढील बैठकीत याबाबत चर्चा होईल, त्यावेळी मी राहुल यांनीच अध्यक्षपदाचा पदभार स्विकारावा अशी आग्रही मागणी करणार आहे, असेही व्होरा यांनी म्हटलंय. 

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप नव्या अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू होती. या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.  काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे, राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही आपले पद हटविले आहे. ट्विटर अकाऊंटवरील बायोटेडातून राहुल यांनी काँग्रेस प्रेसिडेंट हे पद असलेला शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे ट्विटरवरही केवळ काँग्रेस पक्षाचा सदस्य आणि लोकसभा सदस्य असेच पद लिहिले आहे. त्यानंतर, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशPresidentराष्ट्राध्यक्ष