शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 20:57 IST

महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली होती.

Congress CWC Meeting : महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरकडे परतावे. या गोष्टीत इतर कुठलाही मध्यम मार्ग असू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले की, आता निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करावे लागतील. कारण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली नाही. जात जनगणना आणि आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढवण्याबाबत काँग्रेसने जशी स्पष्ट भूमिका घेतली आहे, तशीच संभल प्रकरणासारख्या अन्य मुद्दय़ांवरही ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

बैठकीनंतर केसी वेणुगोपाल काय म्हणाले?बैठकीबाबत केसी वेणुगोपाल म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली. CWC ने पक्षाची निवडणूक कामगिरी आणि संघटनात्मक मुद्द्यांबाबत अंतर्गत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समित्या बुथ आणि जिल्हा स्तरावर पक्षाच्या स्थितीचे मूल्यांकन करतील. यासोबतच, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारी मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या धर्तीवर निवडणूक आयोगाची जबाबदारी सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल, असे काँग्रेसने ठरवले आहे. निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक असल्याचे पक्षाचे मत आहे. यासोबतच CWC ने 1991 च्या 'Places of Worship (Special Provisions) Act' अंतर्गत आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ज्याचे भाजपकडून उघडपणे उल्लंघन केले जात आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीन