शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'संस्थांचा विनाश थांबवला नाहीतर हुकूमशाही वरचढ...', EC च्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 09:23 IST

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. पण, त्याअगोदरच निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि अरूण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. 

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीर ऱ्हास थांबवला नाही, तर लोकशाही हुकूमशाहीने काबीज केली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. 

पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली.ट्विटमध्ये म्हटले की, भारतात आता फक्त एकच निवडणूक आयुक्त आहेत.  तेही काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार असताना. जर आपण स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीरपणे नाश थांबवला नाही तर आपली लोकशाही हुकूमशाहीने उधळली जाईल. ECI आता पडणाऱ्या शेवटच्या घटनात्मक संस्थांपैकी एक असेल. निवडणूक आयुक्त निवडण्याची नवी प्रक्रिया आता सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रभावीपणे गेली आहे. कार्यकाळ पूर्ण होऊन २३ दिवस उलटूनही नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती का झाली नाही? मोदी सरकारने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असंही खरगे यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनीही ट्विटरवरुन टीका केली, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी हे अत्यंत चिंताजनक आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. ECI कसे काम करते? घटनात्मक संस्था कशी कार्यरत आहे? त्यावर सरकार कसा दबाव आणते, याबाबत पारदर्शकता नाही. ही वृत्ती लोकशाही परंपरा नष्ट करण्यावरच राजवटीची झुकलेली असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोग नेहमी पूर्णपणे निःपक्षपाती असणे आवश्यक आहे, अशी टीका केसी वेणुगोपाल यांनी केली.

कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारपासून स्वीकारला आहे. त्यांनी पद का सोडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोयल हे १९८५ च्या बॅचचे पंजाब केडरचे आयएएस अधिकारी होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये ते निवडणूक आयोगात रुजू झाले. अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर तीन सदस्यीय निवडणूक आयोगात आता एकच सदस्य उरले आहेत.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले की, ही बाब चिंताजनक आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पॅनेलवर दोन नियुक्त्या कराव्यात. आपल्या ट्विटमध्ये गोखले म्हणाले की, निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाचे पद रिक्त आहे. निवडणूक आयोगाकडे फक्त एकच मुख्य निवडणूक आयुक्त उरले आहेत'. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस