कॉंग्रेसने संसद कामकाजाचा खेळ बनविला - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: December 15, 2015 20:59 IST2015-12-15T20:59:35+5:302015-12-15T20:59:35+5:30
कॉंग्रेसने संसद कामकाजाचा खेळ बनविला आहे, ते सभागृहात सतत प्रत्येक गोष्टीला विरोध करतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथिल सभेत केली आहे.

कॉंग्रेसने संसद कामकाजाचा खेळ बनविला - नरेंद्र मोदी
>ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. १५ - कॉंग्रेसने संसद कामकाजाचा खेळ बनविला आहे, ते सभागृहात सतत प्रत्येक गोष्टीला विरोध करतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथिल सभेत केली आहे. संसदेत वारांवार होणारा विरोध आणि त्यामुळे कामकाज सतत तहकूब करावे लागत आसल्याने कामकाज व्यवस्थित होत नाही, कामकाज न झाल्यामुळे अनेक विधायके पास झाली नाहीत, काही विधायकात तृटी असतील तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत पण विरोधकाकडून कोणतीच पुष्टी भेटत नाही, असेही ते म्हणाले.
केरळमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या समुदायाला आपल्याकडे आकर्षून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी माजी मुख्यमंत्री आर. शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमापासून मुख्यमंत्री ओमान चंडी यांना दूर ठेवल्याने वाद निर्माण झाला होता.
लोकसभेत झालेला पराभव कॉंग्रेसला अद्यापही पचविता आला नसल्यानेच देशाचा "नाश‘ करणे, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. केरळमधील मागासवर्गीय इझ्वा समुदायाची संघटना असलेल्या श्री नारायणधर्म परिपालन योगमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चर्चा, शिस्त आणि निर्णय यांच्या आधारावर संसदेचे कामकाज चालविण्याचा सल्ला दिला असतानाही अडथळे आणने, नाश करा आणि पाडापाड करा, ही घोषणा कॉंग्रेसने अमलात आणली आहे.