शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरुद्धच्या लढाईत काँग्रेस-माकपात मतभेद; काॅंग्रेस कमकुवत, त्यांनी केवळ देश पातळीवर नेतृत्व करण्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 08:10 IST

काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. 

तिरुअनंतपुरम/थ्रिसूर :काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील या सर्वांत जुन्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी याबाबत केरळमधील सत्ताधारी माकपात मतभेद असल्याचे दिसून येत आहे.  काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. अनेक वर्षे देशावर सत्ता गाजवणारी काँग्रेस आज पूर्वीसारखी नाही. काँग्रेसने हे लक्षात घेतले पाहिजे. देशाच्या अनेक भागांत ती आज कमकुवत आहे. त्यामुळे भाजपला धूळ चारण्यासाठी राज्यांतील भाजपविरोधी सर्व गटांना एकत्र आणणे आणि भाजपचा राज्यनिहाय मुकाबला करणे हीच व्यावहारिक रणनीती आहे,” असे विजयन म्हणाले. ते त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर येथे  आयोजित जाहीर सभेत बोलत होते. एक दिवसापूर्वी गोविंदन यांनीदेखील असेच मत व्यक्त केले होते. कर्नाटक निवडणुकीचे निकाल काँग्रेसचे पुनरागमन दर्शवत नाहीत आणि हा सर्वांत जुना पक्ष स्वबळावर भारताला भाजपमुक्त करू शकत नाही. ते (काँग्रेस) देखील तसा दावा करत नाहीत,” असे गोविंदन म्हणाले होते.रविवारी चेरियान म्हणाले की, काँग्रेस भारतातील सर्वात मजबूत पक्षांपैकी एक आहे व त्यांना भाजपविरोधातील लढाईत पुढे येण्यास सांगणे यात काहीही गैर नाही. त्यांना आघाडीचे नेतृत्व करू द्या,” असेही ते म्हणाले. त्याच वेळी केरळमधील विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेशी आपण सहमत नाही, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकात ४० टक्के, केरळमध्ये तब्बल ८० टक्के कमिशन -त्रिशूर (केरळ) : कर्नाटकातील मावळते भाजप सरकार “४० टक्के कमिशनचे सरकार” असल्याचा आरोप करत तेथील निवडणूक जिंकलेल्या काँग्रेसने सोमवारी केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारवर हल्लाबोल करताना ते “८० टक्के कमिशन”चे सरकार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने सत्ताधारी डावे पक्ष व मुख्यमंत्र्यांना गर्व झाला आहे, असे काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)BJPभाजपा