शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

गडकरींच्या विधानावर काँग्रेसचा पलटवार, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी बदडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:16 IST

मग हनुमानाची जात सांगणाऱ्यांना तुम्ही मारणार का?, असा प्रश्न काँग्रेसनं नितीन गडकरींना विचारला आहे.

नवी दिल्ली- तुमच्याकडे किती जात आहे, याची मला कल्पना नाही. पण आमच्या पाच जिल्ह्यांतून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय की, जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन, असं नितीन गडकरी म्हणाले होते. तोच धागा पकडून काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार केला आहे. मग हनुमानाची जात सांगणाऱ्यांना तुम्ही मारणार का?, असा प्रश्न काँग्रेसनंनितीन गडकरींना विचारला आहे. मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून असं ट्विट करण्यात आलं आहे. नितीन गडकरींच्या जातीचा उल्लेख केलेल्या विधानाचा हवाला देत काँग्रेसनं भाजपावर टीका केली आहे. तसेच नितीन गडकरींचं ते विधान भाजपा नेत्यांसाठीच असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की, मी जात-पात मानत नसून आर्थिक, सामाजिक-समतेच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे.गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले होते. जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता-एकता या आधारावर संपूर्ण समाजाच संघटन झालं पाहिजे होतं. गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी. कोणीही छोट्या किंवा मोठ्या जातीचा असता कामा नये, एकात्मता आणि पूर्ण अखंड समाज असायला हवा हीच संकल्पना असल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं होतं.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले असताना चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील 30 नगरसेवक आणि नेते गडकरी यांना भेटले. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळाला पाहिजे, असा आग्रह या नेत्यांनी धरला. युती होवो अथवा न होवो, पण हा मतदारसंघ शिवसेनेला मिळता कामा नये, अशी भूमिका येथील भाजपा नेत्यांनी स्पष्ट केली होती.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस