शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Video - 'लडकी हूं, लड सकती हूं' कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते भिडले, एकमेकांसोबतच लढले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 11:00 IST

Congress Video : काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपआपसात हाणामारी करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली आहे. असं असतानाच भाजपा आणि विरोधी पक्षाकडून प्रचारसभा आणि दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. राजकारण तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपापसात हाणामारी करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे 'लडकी हूं, लड सकती हूं' या कार्यक्रमाअंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच मारामारी झाली. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते भिडले आणि एकमेकांसोबतच लढले. एका छोट्याशा गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि पुढे तो विकोपाला गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांवर थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्या फेकल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील सूरसदन सभागृहामध्ये काँग्रेसकडून महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दिलेल्या 'लडकी हूं, लड सकती हूं' या नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्तेच एकमेकांना भिडले. काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना खुर्च्यांनी मारत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काँग्रेस कार्यकर्ते कार्यक्रमात भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले

‘लडकी हूं, लड सकती हूं’मोहिमेअंतर्ग झालेल्या या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्या आणि तरुणी सहभागी झाल्या होत्या. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसूझा, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यांच्यासहीत अभिनेत्री आणि महिला नेत्या काम्या पंजाबी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम संपून कार्यकर्त्या बाहेर पडत असतानाच अचानक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि हाणामारी सुरू झाली. हा वाद नक्की कशावरुन झाला, कार्यकर्त्यांमध्ये दोन गट कशामुळे पडले याची माहिती समोर आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी