मोदी सरकारला काँग्रेसचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:58 IST2016-04-30T03:58:10+5:302016-04-30T03:58:10+5:30
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांवर खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करा

मोदी सरकारला काँग्रेसचे आव्हान
नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांवर खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करा आणि सत्य काय आहे, हे समोर आणा, असे आव्हान शुक्रवारी काँग्रेसतर्फे पक्षाचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला दिले.
अगुस्ता वेस्टलँड कंपनीला संपुआ सरकारने काळ्या यादीत टाकले होते, या गुलाब नबी आझाद यांच्या विधानासंदर्भात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणला
आहे. त्याबाबत बोलताना आझाद म्हणाले की, सारी तथ्ये समोर यावीत, अशीच काँग्रेसची इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)