शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...तर पंतप्रधानपदासाठी 'दीदीं'ऐवजी 'बहनजीं'ना काँग्रेस देऊ शकते झुकते माप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:56 IST

त्रिशंकू लोकसभेची शक्यता गृहित धरून काँग्रेसने संभाव्य मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएची सत्ता कायम राहण्याचे संकेत मिळत असले तरी त्रिशंकू लोकसभेची शक्यता गृहित धरून काँग्रेसने संभाव्य मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुरेसे संख्याबळ न मिळाल्यास पंतप्रधानपदाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने प्रादेशिक पक्षांच्या एखाद्या नेत्याला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून मायावतींच्या नावाला पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. केंद्रात विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन होण्याची वेळ आल्यास काँग्रेसच्या वाट्याला पंतप्रधानपद येण्याची शक्यता फार धुसर आहे. अशा परिस्थितीत मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार आदी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. मात्र या नेत्यांपैकी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या नावाला काँग्रेसकडून झुकते मात मिळण्याची शक्यता आहे. मायावती या आपल्या सभांमधून काँग्रेसवर सातत्याने टीका करत असतात. मात्र असे असले तरी मायावती यांच्याशी असलेले सुसंबंध कायम ठेवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्याचे कारण म्हणजे मायावतींना पंतप्रधान केल्यास देशातील एक चतुर्थांश दलित समाजामध्ये काँग्रेसबाबत सकारात्मक संदेश जाऊ शकेल. ही बाब गृहित धरून काँग्रेसने मायावतींना तसे संकेतही  दिले आहेत. 

मात्र काँग्रेसचा कल मायावतींकडे झुकत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहू शकतात. मतमोजणी दिवशी आपल्या राज्यात राहणे अधिक आवश्यक आहे, असे ममता बॅनर्जींचे मत आहे. दरम्यान, मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम चंद्राबाबू नायडू करत आहेत. जर टीएमसीला सपा-बसपा महाआघाडीपेक्षा कमी जागा मिळाल्या तर ममता बॅनर्जी मायावतींच्या नावाला पाठिंबा देऊ शकतात.  पश्चिम बंगालमधील प्रचारादम्यान भाजपा आणि तृणमूल यांच्यात झालेल्या वादावादीनंतर मायावतींनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देऊन त्यांच्याशी सुसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. आता काँग्रेसच्या नेतृत्वासोबतही मायावतींची चर्चा होऊ शकते. अखेरीस दिल्ली गाठण्यासाठी त्यांना काँग्रेसची मदत लागणारच आहे.   

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९