शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 18:01 IST

राहुल गांधी यांच्याविरोधात असाममध्ये FIR दाखल झाली, यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर निशाणा साधला.

Congress Bharat Jodo Nyay Yatra: मणिपूरमधून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. गुवाहाटीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, असाममध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. 

देशात रामाची लाट नाहीश्रीराम मंदिर सोहळ्याला त्यांनी भाजपचा राजकीय कार्यक्रम म्हटले. तसेच, देशात 'रामाची लाट' आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, अशी कोणतीही लाट नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून वर्णन केले. तसेच, राज्यात प्रचंड बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई आहे. शेतकरी चिंतेत असून तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. हेच मुद्दे आम्ही मांडत आहोत. युवा न्याय, सहभाग, महिला न्याय, शेतकरी न्याय आणि कामगार न्याय, हे आमच्या यात्रेचे पाच स्तंभ आहेत. येत्या दीड महिन्यात काँग्रेस पक्ष यात्रेदरम्यान या मुद्द्यांवर आपली मते मांडेल, असंही राहुल यावेळी म्हणाले. 

एकीकडे मोदी-RSS अन् दुसरकडे इंडिया राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखणे, महाविद्यालयात जाण्यापासून रोखणे किंवा पदयात्रा थांबवणे, यातून त्यांची भीती दिसून येत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही. भाजपवाले यात्रेत अडथळे निर्माण करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात यात्रेला मदत करत असतात. यात्रा थांबवावी, अशी माझी इच्छा आहे. आम्हाला महाविद्यालयात जाण्यापासून रोखले पाहिजे, त्यानंतर संपूर्ण विद्यार्ती बाहेर पडले आणि आमचे ऐकले. आज एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे आणि आमच्या इंडिया आघाडीकडे जवळपास 60 टक्के मते आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAssamआसामBJPभाजपा