शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचे ट्विटर लाॅक केल्यावरून काॅंग्रेस संतप्त; माेदी सरकारने दबाव टाकल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 06:31 IST

सरकारने पाेलीसांमार्फत ट्विटरवर दबाव टाकून राहुल गांधींचे खाते लाॅक केल्याचा आराेप काॅंग्रेसने केला. त्यानंतर काॅंग्रेसने हेच फाेटाे पाेस्ट करून ट्विटरला आमचेही खाते लाॅक करण्याचे आव्हान दिले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : दिल्लीत बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांसाेबतचे छायाचित्र पाेस्ट केल्यानंतर ट्विटरने काॅंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे खाते लाॅक केले हाेते. त्यानंतर संतप्त झालेल्या काॅंग्रेसने माेदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. सरकारने पाेलीसांमार्फत ट्विटरवर दबाव टाकून राहुल गांधींचे खाते लाॅक केल्याचा आराेप काॅंग्रेसने केला. त्यानंतर काॅंग्रेसने हेच फाेटाे पाेस्ट करून ट्विटरला आमचेही खाते लाॅक करण्याचे आव्हान दिले आहे.दिल्लीत एका नउ वर्षीय दलित मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली हाेती. या मुलीच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेतली हाेती. या भेटीचे छायाचित्र त्यांनी ट्वीटरवर पाेस्ट केले हाेते. यावरुन ट्वीटरने राहुल गांधी यांचे खाते तात्पुरते लाॅक केले. त्यानंतर काॅंग्रेसने ट्वीटरला आव्हान दिले. सत्य समाेर आणण्यापासून काेणी आम्हाला थांबवू शकत नाही, असे ट्वीट काॅंग्रेसने केले. यासाेबत ‘मै भी राहूल’ असा हॅशटॅगही दिला आहे. काॅंग्रेसने या ट्वीटसाेबतच या भेटीचे छायाचित्रही पाेस्ट केले. पक्षाच्या प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले, की दलितांना न्याय मिळवून देणे गुन्हा असेल तर हा गुन्हा राहुल गांधी आणि काॅंग्रेस वारंवार करतील.दररोज होतात ८७ बलात्कारकाॅंग्रेसने राष्ट्रीय गुन्हेगारीची आकडेवारी सादर केली. त्यानुसार २०१९ मध्ये ३२०३३ बलात्कराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. म्हणजेच माेदी सरकारच्या कार्यकाळात दरराेज बलात्काराच्या ८७ घटना घडत असून १५ टक्के बलात्कार हे लहान मुलींवर हाेत असल्याचे काॅंग्रेसने सांगितले.राहुल गांधी यांनी शनिवारी पीडितेच्या कुटुंबीयांसाेबत भेट घेतली हाेती. यावर काही जणांनी आक्षेप घेतला हाेता. पाेक्साे आणि बाल लैंगिक अत्याचारविराेधी कायद्यानुसार काेणत्याही पीडितांच्या कुटुंबियांसाेबत फाेटाे शेअर करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटर