शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात 60 लाख बोगस मतदार, 'पुरावे' घेऊन काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 17:39 IST

निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करणा-या काँग्रेसनं आता बोगस मतदारांवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

भोपाळ- निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करणा-या काँग्रेसनं आता बोगस मतदारांवरून भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं मतदारयाद्यांत घोळ असल्याचा आरोप करत 60 लाख बोगस मतदार असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. तसेच पत्रकार परिषद घेत काँग्रेसनं सर्व पुरावे सार्वजनिक केले आहेत.मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे. आम्ही मध्य प्रदेशातल्या 100 विधानसभा क्षेत्रातील पडताळणी केली आहे. ज्यात आम्हाला 60 लाख मतदार हे बोगस असल्याचं आढळलं आहे, असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. मध्य प्रदेशची लोकसंख्या 24 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु मतदारांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.मतदारांच्या संख्येतील हे आकडे बुचकळ्यात टाकणारे आहेत. तसेच या बोगस मतदारांची यादी जाणूनबुजून बनवल्याचा आरोपही कमलनाथ यांनी केला आहे. उत्तर प्रदेशशी जोडलेल्या काही भागातील मतदारांची नावे ही दोन्ही राज्यांमधील मतदार यादीत समाविष्ट केलेली आहेत. त्यामुळे नवी मतदार यादी बनवण्यात यावी, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे. तसेच शेजारीत राज्यातील मतदारयाद्यांचीही पडताळणी झाली पाहिजे. हे सर्व भाजपानंच केले असल्यानं त्यांनी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नसल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. 60 लाख बोगस मतदार असल्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सोपवल्याची माहितीही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. 

काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पाच मागण्या केल्या आहेत. मतदार याद्यांची पुन्हा चौकशी करा, प्रत्येक निवडणूक अधिका-याकडून सर्टिफिकेट मागण्यात यावं. ज्यांनी मतदार याद्यांमध्ये बोगस नावं टाकली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पुढच्या यादीतही घोळ आढळल्यास अधिका-यांवर कारवाई व्हावी. तसेच अशा अधिका-यांना 6 ते 10 वर्षं कोणत्याही मतदार प्रक्रियेत सहभागी करून घेता कामा नये.मध्य प्रदेशात 60 लाख बोगस मतदार, पुरावे घेऊन काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव  

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश