शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:51 IST

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत.

नवी दिल्ली: देशातील महागाईविरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी दिल्लीतही काँग्रेसकडून महागाईविरोधात निदर्शने सुरू असताना पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. सध्या काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात आंदोलनासाठी बसले आहेत. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि राहुलसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी काँग्रेसला परवानगी दिली नव्हती. खबरदारी म्हणून सध्या या भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे. महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'देशातील महागाई अनियंत्रित झाली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत.' त्याचवेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'हा विरोध महागाई आणि अग्निपथबाबत आहे. महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. राजकीय पक्ष असल्याने जनतेचा आवाज बुलंद करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. फक्त जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगीदिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. माहितीसोबतच इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार