- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदीतील कथित घोटाळ्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याची तयारीतील मोदी सरकारला बुधवारी सुप्रीम कोर्टाने झटका दिला. काँग्रेस व त्याचे अध्यक्ष राफेलवरून जे प्रश्न विचारत होते व मोदी सरकार त्या प्रश्नांवरून त्रासून गेले होते त्यांची उत्तरे कोर्टाने एकाच फटक्यात विचारल्याने काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण आहे.राहुल गांधी गुरुवारपासून निवडणूक प्रचारात न्यायालयाचा हवाला देऊन राफेलवर आणखी जोरदार हल्ले करतील. तिकडे काँग्रेसने आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना आदेश दिले गेले आहेत की, समाजमाध्यमांपासून ते दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चांत मोदी सरकारची कोंडी करून संयुक्त संसदीय समितीसाठी दडपण कायम ठेवावे. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी आज पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार सत्य जाहीर करण्यापासून दूर का पळत आहे, असाच सवाल केला.
काँग्रेसचा भाजपावर पुन्हा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 01:35 IST