शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

गेल्या 9 वर्षात 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली; कारण एकच- 'राहुल गांधी ऐकत नाहीत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 18:58 IST

2014 नंतर अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. पाहा यादी...

Congress News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसला गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही शुक्रवारी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

एखाद्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना हायकमांडवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. आझाद यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये होते. दरम्यान, गेल्या 9 वर्षात जवळपास 23 बडे नेते काँग्रेसमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास हायकमांडला जबाबदार धरले आहे. यात त्यांचा रोख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर होता.

कोणत्या नेत्याने कधी पक्ष सोडला?1. जगदंबिका पाल- 2014 

2. चौधरी बिरेंदर सिंग- ऑगस्ट 2014 

3. अजित जोगी- 2015

4. हिमंता बिस्वा सरमा- 2015

5. गिरीधर गमंग- 2015

6. एसएम कृष्णा- 2017 

7. शंकर सिंह वाघेला- 2017

8. एनडी तिवारी- 2017

9. विजय बहुगुणा- 2016

10. रिटा बहुगुणा जोशी- 2016

11. अशोक चौधरी- 2018 

12. नारायण राणे- 2016 

14. अल्पेश ठाकोर- 2018 

15. राधाकृष्ण विखे पाटील- 2019 

16. टॉम वडाक्कन- 2019

17. सतपाल महाराज- 2014 

18. अमरिंदर सिंग- 2022 

19. जितिन प्रसाद- 2021 

20. ज्योतिरादित्य सिंधिया- 2019 

21. आरपीएन सिंह- 2022

22. कपिल सिब्बल- 2020 

23. गुलाम नबी आझाद- 2022 

या 23 नेत्यांशिवाय इतर अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, रिपुन बोरा, सुष्मिता देव, विश्वजित राणे, कीर्ती आझाद आणि ललितेश पती त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आसाम, यूपी या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे. सातत्याने नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमधील हायकमांडवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये पक्षाने याबाबत चर्चा केली होती, मात्र या चर्चेनंतरही अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. हे थांबवण्यासाठी काँग्रेसने दोन मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाPoliticsराजकारण