काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे सोमवारी संमेलन

By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:18+5:302015-06-06T00:11:18+5:30

रालोआ सरकारचे अपयश, कृषी संकटावर चर्चा करणार

Congratulations on the Chief Minister of the Congress Monday | काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे सोमवारी संमेलन

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे सोमवारी संमेलन

लोआ सरकारचे अपयश, कृषी संकटावर चर्चा करणार
नवी दिल्ली : काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे संमेलन येत्या ९ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात रालोआ सरकारचे अपयश आणि कृषी संकट या मुद्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
रालोआ सरकारचे सामाजिक क्षेत्राकडे दुर्लक्ष आणि शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश हे संमेलनातील चर्चेचे मुख्य मुद्दे राहण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग़ यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ‘ा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी सातत्याने विचारविमर्श करीत असतात. काँग्रेसने संसदेत आणि संसदेच्या बाहेर ज्या ज्या मुद्यांवर आंदोलन केले आहे, ते सर्व मुद्दे या संमेलनात चर्चेला घेण्यात येतील, असे सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Congratulations on the Chief Minister of the Congress Monday