एसएनडीएलमध्ये गोंधळ -१

By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:53+5:302015-01-23T01:03:53+5:30

एसएनडीएलमध्ये गोंधळ

Confusion in SNDL-1 | एसएनडीएलमध्ये गोंधळ -१

एसएनडीएलमध्ये गोंधळ -१

एनडीएलमध्ये गोंधळ
कार्यालये पाडली बंद : कंत्राटदारांचा संप सुरूच
नागपूर :
एसएनडीएल आणि कंत्राटदारांमध्ये बुधवारी कुठलाही समझोता होऊ न शकल्याने शहरातील वीज वितरण प्रणालीवरील संकट कायम आहे. दिवसभर चाललेल्या गोंधळादरम्यान कंत्राटदार व कर्मचाऱ्यांनी एसएनडीएलची अनेक कार्यालये तब्बल तासभर बंद पाडली. त्यामुळे कामकाज प्रभावित झाले होते.
थकीत रक्कम मिळाली नसल्याचा आरोप करीत कंत्राटदार संघटन व्हेंडर असोसिएशनने बुधवारी संप पुकारला होता. अडीच वर्षांपूर्वी सुद्धा कंत्राटदारांनी याच मुद्यावर संप केला होता. तेव्हा एसएनडीएलने थकीत रक्कम मार्च २०१४ पर्यंत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांना अद्याप थकीत रक्कम मिळालेली नाही. २०१२ पासून स्पॅन्कोवर ६ कोटी रुपये थकीत आहेत. यानंतर एसएनडीएलवर सुद्धा ९ कोटी रुपयापेक्षा अधिक थकीत आहेत.
गुरुवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी एसएनडीएलच्या नारंग टॉवर सिव्हील लाईन्स येथील मुख्य कार्यालयावर धडक दिली तर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील इतर कार्यालयांवर धडक दिली. तुळशीबाग, मानेवाडा आणि छापरुनगर येथील कार्यालये काही वेळासाठी बंद पाडण्यात ते यशस्वी ठरले. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे कॉल सेंटरही बंद पाडले. याचवेळी संपकरी कंत्राटदार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये नारंग टॉवरमध्ये दोन वेळा चर्चा झाली. परंतु त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही.
कंपनीकडून समझोत्याबाबतचा फॉर्म्युला सादर करण्यात आला. यात कंपनी स्पॅन्कोच्या काळातल्या थकीत रकमेपैकी ५० टक्के रक्कम तात्काळ देईल आणि उर्वरित ५० टक्के रक्कम एक महिन्यानंतर देण्यास कंपनी तयार आहे. यासोबतच कंपनी दोन महिन्यांपूर्वीची थकीत रक्कम सुद्धा नियमानुसार देण्यास तयार आहे. परंतु कंत्राटदारांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

Web Title: Confusion in SNDL-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.