दिल्लीतील कुलगुरूंच्या राजीनाम्याबाबत संभ्रम

By Admin | Updated: June 25, 2014 02:27 IST2014-06-25T02:27:14+5:302014-06-25T02:27:14+5:30

दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेशसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले असतानाच, त्याला अधिकृतरीत्या दुजोरा न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

The confusion about the resignation of the Vice Chancellors in Delhi | दिल्लीतील कुलगुरूंच्या राजीनाम्याबाबत संभ्रम

दिल्लीतील कुलगुरूंच्या राजीनाम्याबाबत संभ्रम

>नवी दिल्ली : वादग्रस्त चार वर्षाच्या पदवी  अभ्यासक्रमाला (एफवाययूपी) मूठमाती देण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाविरोधात दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेशसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले असतानाच, त्याला अधिकृतरीत्या दुजोरा न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दिल्ली विद्यापीठाचे प्रसिद्धी माध्यम समन्वयक मलय नीरव यांनी कुलगुरूंनी राजीनामा दिल्याचा एसएमएस पाठवून दुपारी खळबळ उडवून दिली. त्यांना याबाबत विचारण्यात आले असता माङयाकडे यापेक्षा जास्त माहिती नाही, एवढेच उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 
कुलगुरूंच्या राजीनाम्याचे वृत्त धडकताच एफवाययूपीला विरोध करणा:या विद्याथ्र्यानी विद्यापीठाच्या परिसरात ड्रम वाजवून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. 
दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्रलयाच्या वरिष्ठ अधिका:यांनी कुलगुरूंचा राजीनामा मिळाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी संभाव्य     परिस्थितीबाबत यूजीसीच्या अधिका:यांशी चर्चा केली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4विद्यापीठ अनुदान आयोग आणि दिल्ली विद्यापीठ यांच्यात चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या मुद्यांवरून निर्माण झालेल्या वादात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम रद्द करून पूर्वीचाच तीन वर्षाचा अभ्यासक्रम कायम ठेवण्याच्या अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशांना आव्हान देणा:या दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली.

Web Title: The confusion about the resignation of the Vice Chancellors in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.