केरळ विधानसभेत गोंधळ, अर्थमंत्र्यांचा सभागृहातच मुक्काम
By Admin | Updated: March 13, 2015 11:18 IST2015-03-13T11:06:57+5:302015-03-13T11:18:19+5:30
केरळमध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना सभागृहात अभूतपूर्व गोंधळ माजला. विरोधकांनी गोंधळ घालत अर्थमंत्री के. एम. मणी यांना धक्काबुक्की केली.

केरळ विधानसभेत गोंधळ, अर्थमंत्र्यांचा सभागृहातच मुक्काम
>ऑनलाइन लोकमत
कोची, दि. १३ - केरळमध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना सभागृहात अभूतपूर्व गोंधळ माजला. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत अर्थमंत्री के. एम. मणी यांना धक्काबुक्की केल्याने देशातील सर्वात सुशिक्षितांचे राज्य अशी ओळख मिरवणा-या केरळची मान खाली गेली.
अर्थमंत्री मणी यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून त्यांना सभागृहात प्रवेश करू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला होता.हा विरोध पाहून मणी यांच्यासह ७० हून अधिक आमदारांनी काल रात्रीपासून सभागृहातच मुक्काम केला. या सर्व गोंधळातच आज अर्थसंकल्प सादर करणे सुरू झाले असता विरोधकांनी निदर्शने करत गोंधळ माजवला, विधानसभा अध्यक्षांची खुर्चीही उखडून फेकून दिली तसेच मणी यांना धक्काबुक्कीही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना थोडा लाठीमारही करावा लागला. या सर्व गोंधळातच मणी यांनी त्यांचे भाषण कसेबसे पूर्ण केले.
केरळमध्ये बारच्या नुतनीकरण परवाने देण्यासाठी मणी यांनी एक कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर लावला आहे. केरळमध्ये छोटी व मध्यम हॉटेल्स व वाईन शॉपमध्ये दारू विक्रीवर बंदी असून थ्री, फोर व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दारू विक्री करता येते. त्यामुळे या हॉटेल्सच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी अर्थमंत्री मणी यांना लाच मागितली असा आरोप विरोधकांनी केला आहे.