कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:27 AM2021-02-08T05:27:52+5:302021-02-08T07:28:42+5:30

ग्वाल्हेर येथे पत्रकार परिषदेत ताेमर यांनी सांगितले, की शेतकऱ्यांचे आंदाेलन ठराविक भागापुरते मर्यादित आहे. सरकार शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास तयार आहे.

Conflicts with agricultural laws are limited to certain areas says narendra singh tomar | कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा

कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा

Next

ग्वाल्हेर : केंद्रीय कृषी कायद्यांना हाेत असलेला विराेध हा ठराविक भागापुरता मर्यादित असून, लवकरच काेंडी फुटेल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आराेपही त्यांनी काॅंग्रेसवर केला.

ग्वाल्हेर येथे पत्रकार परिषदेत ताेमर यांनी सांगितले, की शेतकऱ्यांचे आंदाेलन ठराविक भागापुरते मर्यादित आहे. सरकार शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास तयार आहे. लवकरच काेंडी फुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ताेमर यांनी काॅंग्रेसच्या भूमिकेवरही टीका केली. सत्तेवर असताना काॅंग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीच का केले नाही?, असा प्रश्नही ताेमर यांनी केला.

काॅंग्रेसने २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीसाठी केलेल्या जाहीरनाम्यात अशाच प्रकारच्या सुधारणांचा उल्लेख केला हाेता. आता त्यांनी भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करून काॅंग्रेसला यश मिळणार नाही, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर म्हणाले.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनात प्रामुख्याने पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुमारे दाेन महिन्यांहून अधिक कालावधीपासून त्यांचे आंदाेलन सुरू आहे.  (वृत्तसंस्था)

Web Title: Conflicts with agricultural laws are limited to certain areas says narendra singh tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.