शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

बस दुर्घटनेवर फडणवीसांकडून शोक, पंकजा मुंडेंनी मदतीसाठी शेअर केला मोबाईल नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:32 IST

मध्य प्रदेशच्या इंदौरहून अमळनेरला जात असलेल्या या एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते

बीड - मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीवरील पुलावरून खोल नदीपात्रात बस कोसळून भीषण दुर्घटना घडली. सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्राच्या एसटी बसला हा अपघाता झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 8 मृतदेहांची ओळख पटल्याचे सांगितले जात आहे. यापैकी तिघे जळगावचे तर दोन राजस्थानचे आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ट्विटवरुन शोक व्यक्त केला आहे. तसेच, सर्वोतोपरी मदतीचे आदेशही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरुन म्हटले. या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडें यांनीही ट्विट करुन दु:ख झाल्याचं सांगितलं. 

Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: आठ जणांची ओळख पटली; मृतांपैकी पाच जण महाराष्ट्रातील

मध्य प्रदेशच्या इंदौरहून अमळनेरला जात असलेल्या या एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरु असून क्रेनने बस नदीपात्राबाहेर काढण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 022-23023940 असा हा क्रमांक आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत, मृतांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.

Breaking News: इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशातील बस दुर्घटनेसंदर्भात ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. दुःख होणार अशी बातमी आज सकाळी आली. जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी फोनवरुन निरोप दिला. पुणे येथून निघालेली एक बस पुलावरुन नर्मदा नदीत पडली आहे. ही बातमी मन सुन्न करुन गेली, असे पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, मी संबधित लोकांना कळवले असून कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीमशी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असे म्हणत पंकजा यांनी मध्य प्रदेशच्या भाजपा प्रदेश मंत्र्यांचा फोन नंबरही शेअर केला आहे.  दरम्यान, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला. संजय सेतू पुलावर समोरून राँग साईडने वाहन येत होते, या वाहनाशी टक्कर टाळण्य़ासाठी एसटी चालकाने प्रयत्न केला. यावेळी नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून ही बस २५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या बसमध्ये १३ मुले असल्याचे सांगितले जात आहे. काही मृतांची ओळख पटली असली तरी त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBus DriverबसचालकAccidentअपघात