कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाची कार्यकारिणी जाहीर

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30

सोलापूर:

Computer Society of India's Executive Committee | कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाची कार्यकारिणी जाहीर

कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाची कार्यकारिणी जाहीर

लापूर:
कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया ही भारतातील माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व व्यावसायिकांची संस्था 1965 पासून कार्यरत आहे. ही संस्था सॉफ्टवेअर, हार्डवेअर, शिक्षण, सायंटिफीक रिसर्च व कम्युनिकेशन या पाच विभागामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व स्थानिक स्तरावर विविध कार्यशाळा, परिषदा, रिसर्च प्रोजेक्ट अशा विविध माध्यमातून तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करीत आहे. या संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे.
संस्थेच्या सभासदांची रविवारी बैठक होऊन नूतन पदाधिकारी निवडण्यात आले. यात रेल्वेतील रेलटेल विभागाचे प्रमुख अभियंता हेमंत कुलकर्णी यांची चेअरमनपदी तर बँक ऑफ इंडियाच्या स्टार युनियन लाईफ इन्शुरन्स कंपनीत कार्यरत शिवाजी उपरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. अन्य पदाधिकार्‍यांमध्ये डॉ. केदार कहाते व्हा. चेअरमन, संदीप देसाई खजिनदार, मॅनेजमेंट कमिटीत विश्वजीत कारंडे, शिरवळ, अरविंद जाधव व दिनेश अगरवाल, श्याम येमूल, नॉमिनेशन कमिटीत अँड. बसवराज सलगर, अक्षय जव्हेरी व अभिजित शिंदे, सल्लगार समितीत प्रा. मोहन देशपांडे, डॉ. अकबर नदाफ, राजेंद्र गांधी, डॉ. बी. शिवशंकर यांचा समावेश आहे.
नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवार, 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता विकास नगर येथे अतिरिक्त मंडल रेल अधीक्षक मनिंदरसिंग उप्पल यांच्या उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Computer Society of India's Executive Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.